गेवराई तालुक्यात विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:16 IST2018-12-08T20:16:31+5:302018-12-08T20:16:53+5:30
ही घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडली होती.

गेवराई तालुक्यात विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
बीड : घरगुती कारणावरून झालेल्या कुरबुरीनंतर विषारी द्रव प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारा दरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडली होती.
राणी रमेश राठोड (२७, रा.पाचेगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ४ डिसेंबर रोजी पाचेगाव येथे विवाहितेने घरगुती कारणावरून झालेल्या कुरबुरीवरून विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तिला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार घेत असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील अनंत पवार यांच्या खबरेवरून रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.