विवाहितेची आत्महत्या, पती, सासू, दीरावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST2021-05-20T04:37:05+5:302021-05-20T04:37:05+5:30

अनिता बालासाहेब मोरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. जवळा येथील सदाशिव चव्हाण यांची मुलगी अनिता हिचा विवाह गावातीलच बालासाहेब ...

Married woman commits suicide | विवाहितेची आत्महत्या, पती, सासू, दीरावर गुन्हा दाखल

विवाहितेची आत्महत्या, पती, सासू, दीरावर गुन्हा दाखल

अनिता बालासाहेब मोरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. जवळा येथील सदाशिव चव्हाण यांची मुलगी अनिता हिचा विवाह गावातीलच बालासाहेब मोरेसोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. विवाहापासून सतत पैशासाठी सासरच्या लोकांकडून शिवीगाळ करीत मारहाण केली जात होती. या जाचास कंटाळून मंगळवारी दुपारी अनिताने विष प्राशन केले. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात सासरच्या लोकांनी दाखल केले. दरम्यान मंगळवारी रात्री १० वाजेदरम्यान तिचा मृत्यू झाला. बुधवारी शवविच्छेदनानंतर फकीर जवळा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अनिताची आई शारदा सदाशिव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पती बालासाहेब शंकर मोरे, सासू कोंडाबाई शंकर मोरे व दीर रवी शंकर मोरे यांच्यावर सिरसाळा पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि प्रदीप एकशिंगे करीत आहेत.

Web Title: Married woman commits suicide