परळीत विवाहितेचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:05 IST2018-05-12T01:05:47+5:302018-05-12T01:05:47+5:30

Marriage abduction in Paroli; Crime against four | परळीत विवाहितेचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा

परळीत विवाहितेचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेचे दहा दिवसांपूर्वी परळीतून अपहरण केले असल्याची तक्रार महिलेच्या भावाने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे. त्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील चौघा जणांविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१ मे रोजी परळीत कामानिमित्त महिला आली होती. अभय बेकरी समोरुन ती गायब झाली. त्यानंतर दहा दिवस शोध घेऊनही शोध लागला नाही. म्हणून १० मे रोजी तिच्या भावाने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील सिध्दबा खाडे, संदीप खाडे, शेषेराव खांडेकर, व आशितोष (पूर्ण नाव नाही) या चौघांविरुध्द संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे म्हणाले की, महिलेच्या अपहरणाचा तपास चालू आहे.

Web Title: Marriage abduction in Paroli; Crime against four