मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेपासून अनेक गावे वंचित - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:04+5:302021-08-12T04:38:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले. परंतु ज्या ...

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेपासून अनेक गावे वंचित - A
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले. परंतु ज्या दिवसापासून ही योजना सुरू झाली, त्या दिवसापासून माजलगाव तालुक्यातील अनेक गावे यापासून वंचित आहेत. या गावांचा ऑनलाईन लिंकमध्ये समावेश करावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजलगाव तालुक्यातील दहा गावे ही ऑनलाईन लिंकवर नसल्याने येथील शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर डक यांनी माजलगाव तालुक्यातील गंगामसला, सुरुमगाव, गुंजथडी, सोन्नाथडी, खरात आडगाव, निपाणी टाकळी, शुक्ल तीर्थ लिमगाव, डाके पिंपरी, मोगरा या गावांचा ऑनलाईन लिंकमध्ये समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यास सिंचनाचे व्यवस्थापन योग्यरितीने शेतकरी करू शकतील. महावितरणवरील भार देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रोहित्राच्या बिघाडाचे प्रमाण कमी झाल्यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील अडचणीतून मुक्तता मिळणार आहे. हा प्रश्न आगामी काळात लवकरच धसास लावणार असल्याचे डक यांनी निवेदनात म्हटले आहे.