१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2023 12:29 IST2023-12-10T12:29:19+5:302023-12-10T12:29:38+5:30
मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे.

१४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी
मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे. 12 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरीसावरगाव या ठिकाणी समारोप सभेला पहिली सुरुवात होणार आहे. 145 एकरवर सभेची मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण शेत शिवार भगवेमय झाले असून शेतकऱ्यांनी आपले उभे पिक काढून मैदान जरांगे पाटलांच्या सभेकरिता उपलब्ध करून दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी सभेच्या व्यासपीठाची पायाभरणी नारळ फोडून केली. जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. तात्पूर्वी ही सभा होत असून त्यामुळे या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 12 डिसेंबर रोजी अंबाजोगाई, केज, धारूर आणि माजलगाव या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.