‘लोकमत’तर्फे २ जुलैपासून रक्तदानाचा महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:41+5:302021-07-01T04:23:41+5:30
बीड : रक्तदान म्हणजे जीवनदान, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्बंध लागल्याने रक्तदान शिबिरे थांबली. परिणामी शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांत अडचणी निर्माण ...

‘लोकमत’तर्फे २ जुलैपासून रक्तदानाचा महायज्ञ
बीड : रक्तदान म्हणजे जीवनदान, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने निर्बंध लागल्याने रक्तदान शिबिरे थांबली. परिणामी शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांत अडचणी निर्माण होत आहेत. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने ‘लोकमत’तर्फे बीड येथे उद्या, २ जुलैपासून ‘लोकमत - रक्ताचं नात’ या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २ जुलै रोजी जालना रोडवरील बीड ब्लड बँकेत (पहिला मजला, हरिओम कॉम्प्लेक्स, द्वारकादास मंत्री बँकेशेजारी) सकाळी १० वाजता या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ बीड शहरासह परळी आणि अंबाजोगाई येथे ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या महायज्ञाचे म्हणजेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविड संकटाच्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांचीही गैरसोय होत आहे. अनेकांना रक्ताची गरज भासते. या परिस्थितीत वेळेत रक्तदाता मिळणे व त्याचा रक्तगट जुळविणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने कोणाला तरी जीवनदान अर्पण करू शकतो.
रक्तपेढ्यांना रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
यांनी करावे रक्तदान
१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती.
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
लसीचा पहिला अथवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.
जर आपण रक्त देण्यास इच्छुक असाल तर आपले नाव, नंबर, शहर, पत्ता या ९६५७१०२१७८ या नंबरवर व्हॉटस्ॲप करा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.