शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

बीडमध्ये बिंदुसरा नदीपात्रात महास्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:14 AM

बीड शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता अभियानास उतरले.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांची फौज उतरली नदीपात्रात; खोलीकरणाचाही केला संकल्प

बीड : शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता अभियानास उतरले.हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. बिंदुसरा नदीचे आठ टप्पे तयार करण्यात आले. यासाठी कार्यकर्त्यांच्या १० टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येक टीमला प्रमुख नेमून त्यांना पोकलँड, जेसीबी, टिप्पर, ट्रॅक्टर, कुºहाड, कोयता हे साहित्य देण्यात आले.

प्रत्येक टीमला एक स्वतंत्र टप्पा स्वच्छ करण्यासाठी देण्यात आला होता. २ टीम राखीव ठेवत त्यांवर महास्वच्छता अभियानात श्रमदान करणाºया कार्यकर्त्यांना चहा, नाश्ता व पाणी पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. योग्य नियोजनामुळे सोमेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील भागापासून ते कृष्ण मंदिरापर्यंत बिंदुसरा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. मोहीम सुरू झाल्यानंतर प्रत्येक टप्प्याची पाहणी आ. विनायक मेटे यांनी केली व योग्य त्या सूचना दिल्या.

स्वच्छता अभियान सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहून अभियानास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, विजयराज बंब, कल्याणराव आखाडे, अशोक हिंगे यांची भाषणे झाली.

डॉ. सुभाष जोशी, डॉ. पी.के. कुलकर्णी, वसंत मुंडे, वैभव स्वामी, रोटरी क्लबचे विजय दुरूंदे, उमेश पवळ, संध्या मिश्रा, नामदेवराव दुधाळ, मंगेश लोळगे, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.हे अभियान यशस्वी करण्यासाठी जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे, सुहास पाटील, अनिल घुमरे, अ‍ॅड. राहुल मस्के, ज्ञानेश्वर कोकाटे, बबन माने, बबन जगताप, दिनेश पवार, सोमनाथ माने, गोपीनाथ घुमरे, अंगद आबूज, दशरथ मोरे, ज्ञानेश्वर पानसंबळ, गणेश मोरे, माऊली शिंदे, योगेश शेळके आदीसह शिवसंग्राम पदधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.जूनअखेर बार्शी नाका पूल वाहतुकीस खुलाबिंदुसरा नदीवरील बार्शी नाका येथील पूलाचे काम 15 ते 20 जूनपर्यंत पूर्ण होईल.आणि जून अखेर पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु या पुलाच्या उदघाटनाची तारीख केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून ठरवली जाईल.त्याच बरोबर नदीवरील बंधाºयाचे काम नगर पालिकेच्या पाईप लाईन शिपटींगमुळे थांबवले आहे.पाईपलाईन शिपटींग झाली की ते कामही लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आ.विनायक मेटे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBindusara Damबिंदुसरा धरणMarathwadaमराठवाडाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान