शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:36 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे.

सतीश जोशी बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. जिल्ह्यातील सहापैकी बीड, माजलगाव, परळी, केज आणि गेवराई या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करून त्यांना कामाला लावले. आष्टीमध्ये त्यांना एकही उमेदवार जाहीर करण्यासारखा मिळाला नाही.शरद पवारांना साथ देणारा जिल्हा म्हणून तशी बीड जिल्ह्याची ओळख. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला १९८० च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. सातपैकी बीड, माजलगाव, गेवराई, चौसाळा आणि केजमध्ये पवारांच्या पक्षाने बाजी मारली. आष्टीमध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तर रेणापूर मतदारसंघात भाजपाचे गोपीनाथ मुंडे विजयी झाले होते. काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षाविरुद्ध या जिल्ह्यातील जनतेने विरोधी पक्षाला जवळ केले होते. यानंतर जिल्ह्यात पवारांना मानणारा मतदार तयार झाला होता. येथील राजकीय घराण्यात उफाळून आलेल्या भाऊबंदकीचे खापर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बारामतीच्या काका-पुतण्यांच्या नावाने फुटू लागले आणि पवारांच्या राष्टÑवादी काँग्रेस पिछेहाट होत राहिली. एकीकडे मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यात राजकीय संघर्षातून अंतर्गत कलह चालू असताना पवारांनी त्याकडे डोळेझाक केली. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, प्रकाश सोळके या मातब्बर नेत्यांमध्ये जिल्हा नेतृत्वासाठी संघर्ष चालू असताना तो मिटविण्याचा प्रयत्न पवारांकडून झाला नाही. ही सर्व मंडळी पवारांच्या शब्दाबाहेरची नव्हती. जिल्ह्यातील या नेतेमंडळीत तीन वर्षांपासून हा संघर्ष चालू होता. या काळात पवार काका-पुतणे अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात येऊन गेली. पक्षांतर्गत गटबाजी होती, परंतु, टोकाची नव्हती. ती मिटण्यासारखी होती. दोन वर्षे पक्षीय कार्यक्रमापासून कोसो दूर असलेले जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांच्या बीडच्या कार्यक्रमास उपस्थितराहिलेच नाहीत तर झाले गेले विसरून त्यांनी या कार्यक्रमाची सारी सुत्रेही स्वत:कडे घेतली होती. क्षीरसागर, पंडित, मुंडे आणि सोळंके एका व्यासपीठावर आल्याचे पाहून वाद मिटला असे जिल्ह्याला वाटले होते. शरद पवार जिल्ह्याच्या वेसीबाहेर पडत नाही तोच या नेतेमंडळीनीही एकमेकांकडे पाठ फिरवली. जिल्हा नेतृत्वपदाच्या या मंडळीच्या हव्यासात बीड जिल्हा शरद पवारांच्या हातातून निसटला.>पंकजा मुंडे यांनीबाजी मारलीराज्याचे नेतृत्व करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या स्वत:च्याच जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. गटबाजीतून आ. सुरेश धस यांना पक्षाने निलंबित केले तर आ.जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादीला जय महाराष्टÑ केला. पंकजा मुंडे यांनी या संधीचा फायदा उचलत धस आणि क्षीरसागरांच्या मदतीने राष्टÑवादी काँग्रेस खिळखिळी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे