Maharashtra Gram Panchayat Election Results: माजलगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीत आ. सोळंकेचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 19:46 IST2021-01-18T19:44:27+5:302021-01-18T19:46:33+5:30
माजलगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चोपणवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली.

Maharashtra Gram Panchayat Election Results: माजलगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीत आ. सोळंकेचा सफाया
माजलगाव : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला असुन यात येथील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांंचा सफाया झाला.
माजलगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चोपणवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यानंतर तालुक्यात सर्वात मोठ्या ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नित्रुड , दिंद्रुड , मोगरा व गंगामसला या ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या.यापूर्वी यासर्व ग्रामपंचायत येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात होत्या.यासर्व ग्रामपंचायतीत या निवडणुकीत आ.सोळंके या पुर्णपणे सफाया झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विशेषतः गंगामसला ग्रामपंचायत ही आ.सोळंके यांच्या पत्नी असलेल्या जि.प.गटातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन ती प्रथमच आमदार सोळंकेच्या विरोधात गेली आहे. या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असुन नित्रुड ग्रामपंचायतील कम्युनिस्टांनी राष्ट्रवादीचा सफाया केला .तर मोगरा व दिंद्रुड ग्रामपंचायतीत भाजप मित्र पक्षाला बहुमत मिळाले असल्याचे भाजपाकडुन सांगण्यात येत आहे तर मोगरा ग्रामपंचायतीत आमचेच बहुमत असल्याचे राष्ट्रवादी कडुन सांगण्यात येत आहे.