शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परळीत महाराष्ट्र बँकेच्या शाखेस आग; मॅनेजरच्या कॅबीनसह तीनरूम जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 15:06 IST

आगीत बँकेतील स्ट्रॉंगरूम सुरक्षित आहे, मात्र महत्वाची कागदपत्रे जळाली असल्याची माहिती 

- संजय खाकरे परळी (बीड): शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या सुभाषचौक रोड येथील शाखेत शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत बँकेच्या व्यवस्थापकाचे कक्ष व शेजारील दोन कॅबिनमधील साहित्य जळून खाक झाले. यात बँकेचे महत्वाचे कागदपत्र ही जळून नष्ट झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान घटनास्थळी महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्र व परळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून ही आग एक तासात नियंत्रणात आणली शनिवार सुट्टी चा वार असल्याने बँकेत अधिकारी कर्मचारी कोणी नव्हते.  सकाळी पावणे दहाच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँके कार्यालयाच्या खिडकीतून धूराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसताच खालील संकुलातील व्यापारी संतोष चव्हाण, फुलझळके यांनी नगरपालिकेला याची तत्काळ माहिती दिली. 

नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख सुनिल आदोडे पथकासह तातडीने बँकेजवळ पोहचले. त्यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यास पाचारण केले. तसेच माहिती मिळताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही तातडीने येऊन दरवाजाचे कुलूप उघडले. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. विद्युत केंद्राच्या सुरक्षितता विभागाचे वैजनाथ चाटे, परमेश्वर नागरगोजे, पांडुरंग काकडे, अशोक मुंडे, योगेश मंडलिक, अनिल परदेशी, फारूक व नपचे आदोडे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. थर्मलचे सुरक्षा अधिकारी एच. डी उदार यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळास  पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, सपोनि नारायण गित्ते, डीबीचे व्यंकटराव भताने यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मदत कार्य केले.

आगीत बँकेच्या व्यवस्थापकाच्या कक्षातील कागदपत्रे जळाली आहेत. बँकेतील स्ट्रॉंगरूमला मात्र काहीही झाले नसल्याचे समजते. तसेच संगणकाचे ही नुकसान झाले आहे. अन्य दोन ठिकाणच्या कक्षाला आग लागल्याने कपाटातील कागदपत्रे जळाले आहेत. सुभाषचौक रोड येथील ही शाखा गैरसोयीचे आहे. दुसया मजल्यावर अपुऱ्या जागेत बँक असल्याने खातेदाराची नेहमी कुचंबणा होते. आगीत काय काय कागदपत्रे जळाली हे मात्र समजू शकले नाही. आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. काही वर्षात पूर्वी ही बँक शाखेस आग लागली होती,

टॅग्स :Beedबीडfireआग