शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

पाऊस भरपूर, निम्मे प्रकल्प अद्याप तहानलेलेच; बिंदुसरा मात्र तुडुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:13 AM

जिल्ह्यात यंदा १ जूनपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत ६३५. ३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५.३४ टक्के इतके आहे.

ठळक मुद्देप्रथमच अनुभव : ९५ टक्के पाऊस, पाणी नियोजन करावे लागणार

बीड : जिल्ह्यात यंदा १ जूनपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत ६३५. ३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५.३४ टक्के इतके आहे. आणखी दोन तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. पाऊस मुबलक झालेला असताना मात्र जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ६४ प्रकल्पांची तहान किंचितही भागलेली नाही. ३२ प्रकल्प जोत्याखाली तर ३२ प्रकल्प कोरडे आहेत. एकीकडे ओल्या दुष्काळी परिस्थिती असताना प्रकल्पांतील जलसाठ्याबाबत समृद्धी दूरच आहे.बीड जिल्ह्यात जूनमध्ये ७०.२० मिमी पाऊस झाला. जुलैमध्ये हे प्रमाण ६८.५० मिमी, आॅगस्टमध्ये ६३.३० तर सप्टेंबरमध्ये १७२.२० मिमी पाऊस झाला. चार महिन्यात कमी पडलेल्या पावसाने आॅक्टोबरमध्ये कसर भरुन काढली. या महिन्यात तब्बल २६१ मिमी पाऊस झाला. पाच महिन्यात ६३५.३ मिमी पाऊस एकूण पाऊस झाला. हे प्रमाण ९५.३३ मिमी इतके आहे. त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतू पडलेल्या पावसाच्या तुलनेत प्रकल्पांमधील जलसाठा कमीच आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे १४४ प्रकल्प आहेत. १२६ लघु प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्पातच १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ७५ टक्क्यांपर्यंत ४ प्रकल्प भरलेले आहेत. १२ तलावांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. ८ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. २८ जोत्याखाली, २७ प्रकल्प कोरडे आहेत. १६ मध्यम प्रकल्पांपैकी एकच प्रकल्प १०० टक्के भरला आहे. ७५ टक्के पाणी एका प्रकल्पात आहे. ५० ते ५५ टक्के पाणीसाठा एका प्रकल्पात आहे. दोन प्रकल्पात २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ३ प्रकल्प जोत्याखाली तर ५ प्रकल्प कोरडे आहेत.‘मांजरा’ जोत्याखालीचमोठा प्रकल्प असलेला मांजरा अद्यापही जोत्याखाली आहे. तर माजलगाव प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव आणि बिंदुसरा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मिटल्यात जमा आहे.एकूण प्रकल्प १४४१०० टक्के ३५०७५ टक्के ०५५० ते ७५ टक्के १४२५ ते ५० टक्के १०२५ टक्क्यांपेक्षा कमी १६जोत्याखाली ३२कोरडे ३२

टॅग्स :BeedबीडWaterपाणीRainपाऊस