शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

विनायक मेटेंच्या हाती पुनश्चः घड्याळ; कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:20 PM

पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यात केलेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने ‘राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही’ अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला. भाजप श्रेष्ठींनी शिवसंग्रामची भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात लोकसभेसाठी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसला असेल असे त्यांनी जाहीर केले.   

बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. 

या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज  कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्यात त्यांनी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर केला. जिल्ह्यातील आगामी राजकारण पाहता मेटेंनी जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

मुंडे यांच्याकडून फारसे महत्व नाही  पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vinayak Meteविनायक मेटेPankaja Mundeपंकजा मुंडे