शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:27 IST

अजूनही क्षीरसागर बंधू शांतच; तर मुंडे भगिनींनी केली विनायक मेटेंची ‘शिवसंग्राम’ खिळखिळी

- सतीश जोशी 

बीड : लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बहुजन वंचित आघाडीचे प्रा.विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, नोंदणीकृत पक्षाचे आठ आणि २६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जरी रिंगणात असले तरी  आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मात्र उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे, त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे विरुद्ध विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यातच झडत आहेत. आतापर्यंत या बहीण भावात अधूनमधून आरोप-प्रत्यारोप होत होते परंतु, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही तीव्रता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसांपासून या बहीण-भावांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनीच्या विरुद्ध रान उठविण्यास सुरुवात केली, तरी त्यांच्या सुरात सूर मिसळणारा इतर नेतेमंडळीचा आवाज तेवढा खुललेला दिसत नाहीत. उमेदवारी न मिळाल्याने माजी आ. अमरसिंह पंडित आणि त्यांचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे स्थानिक आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर अजूनही गप्पच आहेत. उमेदवारी अर्ज भरतानादेखील ते अनुपस्थित होते. क्षीरसागर बंधूंची भाजपशी वाढणारी जवळीक सोनवणे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. केजमध्ये नंदकिशोर मुंदडा यांच्याशी सोनवणे यांनी जूळवून घेतले आहे. एकीकडे तगडे नेटवर्क असलेला डॉ. प्रीतम मुंडेंसारखा उमेदवार आणि दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजी, असा दुहेरी सामना बजरंग सोनवणे यांना करावा लागत आहे.

इकडे भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी वर्षभरापासूनच मतदार संघात संपर्क वाढविला आहे. सहापैकी पाच विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार क्षीरसागरही सहकार्याच्या भूमिकेत आहे. राष्ट्रवादीतून निलंबित झालेल्या माजी मंत्री सुरेश धसांना विधान परिषदेवर निवडून आणून भाजपची ताकद वाढविली. आ. विनायक मेटेंचा विरोध असला तरी तीन जि. प. सदस्य फोडून त्यांची शिवसंग्राम खिळखिळी करून टाकली आहे. बहुजन विकास आघाडीकडून  प्रा. विष्णू जाधव हे ही रिंगणात उतरले आहेत.

प्रमुख उमेदवार :डॉ. प्रीतम मुंडे । भाजपबजरंग सोनवणे। रा.काँ.प्रा. विष्णू जाधव । वंचित बहुजन आघाडी 

कळीचे मुद्देअहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा भाजपसाठी कळीचा मुद्दा होऊ शकतो. लोकसभा २०१९ हा मार्ग पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक प्रमुख नेत्यांची बीड जिल्हा सहकारी बँकेची कर्ज थकबाकी प्रकरणे प्रचारात निघू शकतात.

विकासासाठी प्रयत्न परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाची नगरकडून बीडच्या वेशीपर्यंत यशस्वी चाचणी झाली आहे. ऊर्वरित कामही युद्धपातळीवर चालू आहे. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृहाची कायमस्वरूपी सुविधा करण्याचा मानस आहे. खेळाडूंच्या विकासासाठी उपाययोजना करणार.    - डॉ. प्रीतम मुंडे, भाजप 

शासन विरोधी नाराजीचा फायदा माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ३० वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीने झाली आहे. त्यानंतर अनेकवेळा जिल्हा परिषद निवडणूक लढविली. स्थानिक पातळीवर काम केल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. या निमित्ताने जनतेचे प्रश्न देशपातळीवर मांडण्याची संधी मिळेल. शासनाच्या विरोधातील नाराजीचा मला फायदा मिळेल.- बजरंग सोनवणे, रा.काँ.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliticsराजकारण