शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक ऑगस्ट रोजी लोकन्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे, बँकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक ...

न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे, बँकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन कोविड १९ या आजाराच्या बाबतीत असणाऱ्या सर्व नियमावलींचे पालन करून करण्यात आले. पक्षकारांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घ्यावीत. न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँडसॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊनच प्रवेश करावा आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी केले आहे.

जुना भाजीबाजारच्या रस्त्यावर खड्डे

शिरूर कासार : मुख्य भाजीबाजाराचे ठिकाण तथा जुने बस स्टॅण्ड समजले जाते तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनचालकासह पायी चालणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील आडवा खड्डा त्रासाचा ठरत आहे. रात्रीच्या अंधारात पायी चालत जाणारे खड्ड्यात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवारी पावसाने दिली उघडीप

शिरूर कासार : गेले सहा-सात दिवसांपासून रोजच पाऊस पडत असल्याने शेतकामे थांबली होती. मात्र शुक्रवारी व शनिवारीदेखील चांगले ऊन पडल्यामुळे पुन्हा कामाला सुरुवात झाल्याचे चित्र शेतात दिसून येत आहे.

गुरू-शिष्यात कोरोनाने निर्माण केला दुरावा

शिरूर कासार : शुक्रवारी गुरुपौर्णिमा मात्र कोरोनामुळे गुरू-शिष्यातदेखील दुरावा निर्माण झाला होता, यातून मधला मार्ग म्हणून गुरुपौर्णिमा महती शिष्यांना ऑनलाइन पध्दतीने सांगितली, मात्र ही सुविधा सर्वसामान्य भक्ताकडे नसल्याने गुरूचे दर्शन कित्येकांना घेता आले नाही. पंढरपूर निवासिनी भागवताचार्या साध्वी अनुराधा दीदी यांनी आपल्या समाजबांधवांसह शिष्यपरिवाराला ऑनलाइन पध्दतीने प्रवचन सांगितले, तर मोबाइलवरच आपल्या गुरूंचे दर्शन घेत समाधान मानावे लागले. कार्यक्रमाचे आयोजन दिव्यराधा सत्संग परिवाराकडून करण्यात आले होते. यात काही शिष्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल शेटे बीड, शिवाजी काटकर शिरूरकर, महारुद्र वीर, रवींद्र शिनगारे, सचिन भांडेकरसह शिष्य परिवार सहभागी झाला होता. सूत्रसंचालन अभय कुंभकर्ण यांनी केले होते.

कापसावर मावा तुडतुडे

शिरूर कासार : नाही म्हटले तरी तालुक्यात जवळपास तीस हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली, पाऊस पडत गेला, मेहनत होत गेली. परिणामी कापसाचे झाड जोम धरत असले तरी सततच्या ढगाळ वातावरणाने कापसावर मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी केले आहे.

240721\img-20210723-wa0069.jpg

भागवताचार्या साध्वी अनुराधा दिदी यांचे आॅनलाईन प्रवचन गुरूपौर्णीमा निमित्ताने