Leopard thaiman in Ashti taluka; The third victim took in four days | आष्टी तालुक्यात बिबट्याचे थैमान; चार दिवसात घेतला तिसरा बळी

आष्टी तालुक्यात बिबट्याचे थैमान; चार दिवसात घेतला तिसरा बळी

ठळक मुद्देपारगाव परिसरात आज दोन महिलांवर हल्लासायंकाळी बिबट्याच्या महिला हल्ल्यात मृत्युमुखी

आष्टी/कडा ( बीड) - आष्टी तालुक्यात सलग तिस-या दिवशी बिबट्याचे थैमान सुरूच आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता पारगांव जोगेश्वरी येथील बोराडे वस्तीवर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्यात ती महिला जखमी झाली आहे. याच ठिकाणी सायंकाळी एका 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृृृृत्य झाला. विशेष म्हणजे सकाळच्या हल्ल्यापासून पारगांव जोगेश्वरी परिसरातच वनविभागाचे पथक तैनात असूनही महिला बिबट्याची शिकार झाली. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून वनविभाच्या पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आले आहे.

मागील चार दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे.आज सकाळी शालन शहाजी भोसले या 61 वर्षिय महिलेवर बोरोडे वस्ती परिसरात बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने बिबट्याच्या जबड्यातून त्यांची सुटका झाली. याठिकाणी लगेचच वनविभागाने पथके पाठवून पिंजराही लावला. मात्र,सायंकाळी 6 च्या सुमारास याच परिसरात सुरेखा निळकंठ बळे ही महिलेचा मृृृृृृतदेह आढळून आला. यापूर्वी बिबट्याने दोन बळी घेतले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Leopard thaiman in Ashti taluka; The third victim took in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.