शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 23, 2024 17:12 IST

उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते.

छत्रपती संभाजीनगर : मध्यंतरी लिंबू महाग झाल्याने सरबत विक्रेत्यांनी तैवान देशातून आणण्यात आलेल्या सायट्रिक ॲसिडचा वापर करून सरबत तयार करीत आहेत. आपणही रस्त्यावर सायट्रिक ॲसिडपासून बनविलेले लिंबू सरबत प्यायले असेल. ‘थंडा थंडा कूल कूल’ हे सायट्रिक ॲसिड म्हणजे ‘लिंबू सत्त्व’ होय.

सायट्रिक ॲसिड‘सायट्रिक’ हा शब्द लॅटिन शब्द ‘सिट्रॉन’वरून आला आहे. ज्याचा अर्थ लिंबासारखे मोठे, सुवासिक लिंबूवर्गीय फळ, असा होतो. त्यास आपल्याकडे ‘लिंबू सत्त्व’ असे म्हणतात. यापासून शरीराला काही अपाय होत नाही.

लिंबू महागल्यावर त्यावर पर्यायमध्यंतरी लिंबाचे भाव २०० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यावेळेस सरबत बनविणारे १२० रुपये किलोच्या ‘लिंबू सत्त्व’चा वापर करीत होते. अजूनही अनेक सरबत विक्रेते याचाच वापर करतात. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे सरबताची विक्री कमी झाली आहे. याचा परिणाम लिंबाच्या किमतीवर झाला. सध्या भाजी मंडईत लिंबूही १२० रुपये किलोने मिळत आहे.

सायट्रिक ॲसिडचा शोध कोणी लावला?लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिड हे आम्ल आढळून येते. लिंबू, संत्री, मोसंबी इ. फळात सायट्रिक ॲसिड आढळून येते. त्याची चव आंबट असते. इंग्लंडमधील कार्ल्स शील्स यांनी १८७४ मध्ये लिंबाच्या रसात सायट्रिकॲसिडचा शोध लावला.

प्रत्येक स्वयंपाकघरात असते लिंबू सत्त्वकिराणा दुकानात ५० ग्रॅम लिंबू सत्त्व १० रुपयांना मिळते. अनेक पदार्थांमध्ये लिंबू सत्त्वाचा वापर केला जातो. विशेषत: ढोकळा बनविण्यासाठी लिंबू सत्त्वच वापरले जाते.

दर महिन्याला २ टन लिंबू सत्त्वाची विक्रीहॉटेललाइनमध्ये लिंबू सत्त्वाचा जास्त वापर होतो. उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते. या हंगामात दर महिन्याला २ टन लिंबू सत्त्वाची विक्री होते. एरव्ही पावसाळ्यात व हिवाळ्यात केवळ ३०० ते ५०० क्विंटलच लिंबू सत्त्व विकले जाते, असे ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारfoodअन्न