हळद निघण्याआधीच नवरदेवाने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:41 IST2019-05-28T00:40:57+5:302019-05-28T00:41:13+5:30
पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे हा लग्नाच्या दहाव्या दिवशीच घरातून निघून गेला. या बाबत वरपित्याने मुलगा हरवल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

हळद निघण्याआधीच नवरदेवाने सोडले घर
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे हा लग्नाच्या दहाव्या दिवशीच घरातून निघून गेला. या बाबत वरपित्याने मुलगा हरवल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे (२१) याचे लग्न पाथरी तालुक्यातील कडुळ येथे ८ मे रोजी झाले होते.त्यानंतर धार्मिक कार्यक्र मासह १७ रोजी सत्यनारायण कार्यक्र म झाल्यानंतर माणिक १८ रोजी सकाळी ७ वाजता शौचास जातो म्हणून निघून गेला.
तो रात्रीपर्यंत परत न आल्याने माणिकचे वडील व नातेवाईकांनी परिसरात त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नसल्याने त्याचे वडील प्रभु आत्याबा कोरडे यांच्या खबरीवरु न माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. असून पुढील तपास पो.हे. व्ही.एम.राठोड हे करत आहेत.
अचानक हा तरुण काही न सांगताच निघून गेल्याने पत्नी, आई हे काळजीत पडले आहेत.