स्वत:शीच स्पर्धा करायला शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:03+5:302021-06-20T04:23:03+5:30
बीड : सद्यपरिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळीही वाढली आहे. त्यामुळे स्वत:शीच ...

स्वत:शीच स्पर्धा करायला शिका
बीड : सद्यपरिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळीही वाढली आहे. त्यामुळे स्वत:शीच स्पर्धा करायला शिकले पाहिजे. स्वत:च स्वत:चा आलेख प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुढे नेला पाहिजे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता शेटे यांनी केले.
येथील माऊली विद्यापीठ संचालित महिला कला महाविद्यालयामध्ये १७ जून रोजी विद्यार्थी विकास विभागाद्वारा विद्यार्थिनींसाठी ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सविता शेटे बोलत होत्या. वाचन, मनन, चिंतन आणि लेखन याबरोबरच संवाद कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी खूप आधीपासून केली पाहिजे. पदवीचे शिक्षण घेत-घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर चांगली तयारी होते. कला शाखेचा स्पर्धा परीक्षेला कसा फायदा होतो हे सांगितले, असेही त्यांनी सांगितले.
वेबिनारची सुरुवात ‘गीत आमुचे आकाशाचे’ या विद्यापीठ गीताने करण्यात आली. प्रास्ताविक प्रभारी सहायक प्रा. डॉ. सुनंदा आहेर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनी, सहायक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.