धारूर आगारातून सोमवारपासून लालपरी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST2021-06-06T04:25:41+5:302021-06-06T04:25:41+5:30

धारूर : गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारी धारूर आगारातील एस.टी. प्रवासी सेवा ७ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांनी ...

Lalpari will run from Dharur depot from Monday | धारूर आगारातून सोमवारपासून लालपरी धावणार

धारूर आगारातून सोमवारपासून लालपरी धावणार

धारूर : गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारी धारूर आगारातील एस.टी. प्रवासी सेवा ७ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांनी कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून प्रवासी वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी केले आहे.

धारूर एस.टी.आगारांमध्ये १४ एप्रिलपासून बंद असणारी प्रवासी वाहतूक सेवा आता सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. प्रवाशांनी प्रवास करताना सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा. ७ जून रोजी केज, अंबाजोगाई, माजलगाव या ठिकाणांसाठी प्रति तासाला तर बीडसाठी प्रत्येक दोन तासाला व पुणे-मुंबई ही संध्याकाळच्या वेळी गाडी जाणार आहे. प्रवाशांनी या प्रवासी वाहतुकीचा लाभ सर्व नियमांचे पालन करून घ्यावा, असे आवाहन धारूर आगाराचे आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी केले आहे.

===Photopath===

050621\img_20210602_123629_14.jpg

Web Title: Lalpari will run from Dharur depot from Monday