शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परळीत भीषण आगीत लाखों रुपयांचे फेटे अन् लॉन्ड्रीतील कपड्यांची राख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:37 IST

या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे.

परळी : शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागातील शिरीष सलगरे यांच्या पत्र्याच्या  शटर च्या दुकानातील सहित्यास व लगतच्या लॉन्ड्री व फेट्याच्या दुकानास मंगळवारी रात्री अचानक  आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री उशिरा सव्वा बारा वाजता ही आग नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. या आगीत शिरीष सलगरे यांचे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य व अर्जुन बुंदीले यांचे ५ लाख रुपयाचे लग्नातील फेटे व कपडे व इतर साहित्य जळाले आहे. 

येथील विवेकानंद नगर भागात श्री शिरीष सलगरे हे राहतात. त्यांच्या घरासमोरच त्यांचे पत्राची चार दुकाने आहेत या चार दुकानापैकी एका दुकानात अर्जुन बुंदिले यांचे तुळजाभवानी फेटेवाले हे भाड्याने लॉन्ड्री सेंटर व फेट्याचे दुकान आहे. या दुकानात फेटे व लॉन्ड्री चे कपडे होते. तर शिरीष सलगरे यांचे दुकानात घरगुती वापराचे साहित्य होते हे साहित्य मंगळवारी रात्री लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रात्री साडेआठ वाजता अर्जुन बुंदिले ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास या दुकानातून अचानक धुरांचा लोट बाहेर आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

नागरिकांनी लागलीच नगरपालिकेच्या अग्निशामन विभागास माहिती दिली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासांनंतर रात्री सव्वा बाराच्या सुमारास आग पूर्णपणे शमली. मात्र तोपर्यंत फेटे आणि लॉन्ड्रीमधील कपडे जळून नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Beedबीडfireआग