श्रीमद्भागवताची काल्याच्या कीर्तनाने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:20 IST2018-09-25T01:20:49+5:302018-09-25T01:20:59+5:30
शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली.

श्रीमद्भागवताची काल्याच्या कीर्तनाने सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली. भक्ती दीदी या कथेच्या प्रवक्त्या होत्या.
मंडळाच्या वतीने गणेशोेत्सवात संगीत खुर्ची, चित्रकला, निबंध स्पर्धा आदी कार्यक्र म घेण्यात आले होते. २२ रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळाने शिवहार शेटे, कैलास गोस्वामी, प्रल्हाद समदाने, राजू शाहू यांच्या पुढाकाराने अन्नदानाचे आयोजन केले होते. शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष गजानन चौधरी, शरद भुलंगे, दीपक भोसले, रणजित तसनुसे, शुभम भगत, ज्ञानेश्वर टोंबे, विकास वाडेकर, महेश गायकवाड, बबलू शिंदे, राज पाटील, राहुल पाटील, आकाश गायकवाड, सचिन भुलंगे, अभिषेक गव्हाणे, पंकज झाडे, जगदीश पुरी, धीरज पुरी, कैलास गिरी, रामा शिंदे, विजय गिरी, बाबा शिंदे, अभिषेक किर्जत, अनिकेत बनायत, विजय सोळंके, संभाजी मोटे, संदीप राऊत यांनी परिश्रम घेतले.