दोन लाखांसाठी तरुणाचे अपहरण; पाच दिवस शेतात बांधून केली अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 12:21 IST2023-06-26T12:20:47+5:302023-06-26T12:21:20+5:30

पाच दिवस एका शेतात उपाशी ठेवून केली अमानुष मारहाण

Kidnapping of youth for two lakhs; He was tied up in the field for five days and brutally beaten | दोन लाखांसाठी तरुणाचे अपहरण; पाच दिवस शेतात बांधून केली अमानुष मारहाण

दोन लाखांसाठी तरुणाचे अपहरण; पाच दिवस शेतात बांधून केली अमानुष मारहाण

दिंद्रुड: ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी घेतलेले २ लाख रुपये परत दिले नाहीत या कारणाने तरूणाचे अपहरण करत मारहाण केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे एका शेतात जवळपास पाच दिवस अपहृत तरुणाला अमानुष मारहाण करून सोडण्यात आले. दिंद्रुड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील अशोक अंतराम मंत्री याने कांदेवाडी येथील भरत ज्ञानोबा कांदे यांच्याकडून दोन लाख रुपये ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतले होते. ते परत दिले नसल्याचा राग मनात धरून २० जून रोजी दिंद्रुड नजदीक असलेल्या चाटगाव फाट्यावरून अशोकचे अपहरण भरत कांदे, सतीश कांदे, सुरेश ज्ञानोबा कांदे या भावंडांनी केले. अशोकचे वडील अंतराम मंत्री यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात २१ जून रोजी गुन्हा दाखल झाला करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात आष्टी शिवारातील एका केळीच्या बागेत लिंबाच्या झाडाला अपहृत अशोक मंत्री यास पाच दिवस बांधून ठेवले होते. उपाशीपोटी ठेवत अमानुष मारहाण करून २४ जून रोजी मध्यरात्री अशोकला दिंद्रुड नजदीक सोडण्यात आले. अशोकच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. बीड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

Web Title: Kidnapping of youth for two lakhs; He was tied up in the field for five days and brutally beaten