खाकी हीच राखी-सिद्धार्थ माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:37+5:302021-08-23T04:35:37+5:30
.... सहा दिवसानंतर सूर्यदर्शन शिरूर कासार : गेल्या सहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. ...

खाकी हीच राखी-सिद्धार्थ माने
....
सहा दिवसानंतर सूर्यदर्शन
शिरूर कासार : गेल्या सहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. आता गेल्या सहा दिवसांपासून सूर्यदर्शनच नव्हते. रविवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून चांगले ऊन पडल्याचे दिसत होते. दरम्यान, आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
...
आता गौरी गणपतीचे वेध
शिरूर कासार : पाहता पाहता पोळा सण तोंडावर आला आहे. पोळा संपताच गणपती गौरी हा सण महिलांची धाकटी दिवाळी मानली जाते. श्रीगणेश स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व नंतर तिसऱ्या दिवशी विसर्जन असा तीन दिवस हा सण चालतो. आतापासूनच महिलांमध्ये गौरी सणासाठी लागणारे मुखवटे, हाताचा जोड, छत, रोषणाई साहित्य आदी वस्तू खरेदीकडे कल दिसून येत आहे. पाऊस पिकासाठी पोषक झाल्याने हे सण देखील उत्साहात साजरे होतील, असे व्यापारी वर्गात बोलले जाते.
....
पावसाने कापसाचा रंग बदलला
शिरूर कासार : हलक्या शेतात पावसाने ओढ दिल्याने पिकांना फटका बसायचा. तो यंदाही बसला; परंतु जाड रानातील शेतात कपाशीचे पीक हिरवेगार दिसत होते. शिवाय पाते, फुलांचा बहर लागला होता; मात्र पाऊस पडल्यानंतर कापसाचा रंग बदलला आहे. पाने लालसर पडू लागल्याने लाल्या रोगाचे संकट येते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. कापसाच्या पिकात बदल जाणवत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करून शिफारशीप्रमाणे औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी कार्यालयाच्या वतीने केले आहे.
....
थंडी, तापाचे रुग्ण वाढले
शिरुर कासार : कोरोनाचा वेग मंदावला असला तरी सध्या बदलत्या वातावरणात शिरूर कासार परिसरात थंडी, ताप, सर्दी, खोकला या आजारात मोठी वाढ झाली आहे. या साथरोगामुळे रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे. आजार किरकोळ असला तरी त्याची मोठी धास्ती रुग्णांना वाटते. शारीरिक त्रासाबरोबर आर्थिक झळ सुद्धा यामुळे बसत आहे.
220821\img-20210822-wa0016.jpg
फोटो