उपाध्यक्षपदी खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:18+5:302021-01-10T04:26:18+5:30
बीड : लहुजी विद्रोही सेना विद्यार्थी आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी सिध्दांत खाडे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष भास्कर ...

उपाध्यक्षपदी खाडे
बीड : लहुजी विद्रोही सेना विद्यार्थी आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी सिध्दांत खाडे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रांत कोअर कमिटी उपाध्यक्ष नानाभाऊ वाल्हेकर, संतोष पौह, नागनाथ आलाट, अनिल ढगे आदींच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
पथदिवे लावावेत
माजलगाव : शहरातील जुना माजलगाव भागात सिंदफणा नदी तीरावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत पथदिवे लावावेत व तेथे असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करावे. असे न झाल्यास २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी दिला आहे.
डेथ रेट ३.१६ टक्के
बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ५४० जणांचा मृत्यू झाला असून, डेथ रेट ३.१६ टक्के इतका आहे. प्रशासनाने मृत्यू रोखण्यासाठी उपचारात उपाययोजना करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.०५ टक्क्यांवर
बीड : जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी ५४० जणांचा मृत्यू झाला असून, १६ हजार २२७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.०६ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली. यापेक्षाही जास्त वाढ होईल, असा विश्वासही आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
आयटीआय सीसीसीत ९५ खाटा रिकाम्या
बीड : येथील शासकीय आयटीआय मधील कोविड केअर सेंटरमध्ये १०० खाटा मंजूर आहेत. पैकी ५ खाटांवर रुग्ण असून, ९५ खाटा रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.
बीडमध्ये १३ रुग्ण
बीड : शहरात शनिवारी १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये मित्रनगर, पालवणचौक, बालेपीर, सोमेश्वरनगर, अंकुशनगर, सहयोनगर, शिवाजीनगर, पालवण, कृष्णाईनगर, स्वराज्यनगर, कॅनरा बँक कॉलनी, दुधिया गल्ली, भक्ती कन्स्ट्रक्शन, काशीनाथनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.