'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने
By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2023 18:46 IST2023-06-05T18:45:24+5:302023-06-05T18:46:33+5:30
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने
बीड : नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या भीमसैनिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. सदरील घटनेचा निषेध करत या प्रकरणी सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्ष, संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते ही अतिशय निंदनीय बाब आहे. त्यामुळे अक्षय भालेराव यांच्या यांच्या कुटुंबास तत्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या कुटुंबीयास ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलिस चौकीची स्थापना करावी, तसेच सर्व आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात यावी यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
यांचा होता आंदोलनात समावेश
रवी वाघमारे, आशिष कुमार चव्हाण, अजय सरवदे, अनिल तुरुकुमारे, संदीप जाधव, प्रशांत ससाने, प्रमोद शिंदे, संगीता वाघमारे, अरुणा आठवले, अनिता डोंगरे, दीपक कांबळे, धम्मपाल विद्यागर, सनी आठवले, बाळासाहेब काकडे, राजू कांबळे, नितीन सोनवणे, रजनीकांत वाघमारे, विनोद सवाई, गौतम इनकर, अशोक प्रधान, अमोल अहिरे, नितीन जोगदंड, अशोक काकडे, सिद्धार्थ जोगदंड, अशोक हुंबरे, शांतिदूत घोडके, धीरज वाघमारे, विशाल सोनवणे, आकाश वाघमारे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते, विजय चांदणे, अशोक गायकवाड, संतोष जोगदंड, नितीन मुजमुले, अमोल चंदनशिव, प्रवीण टाकणखार, अमोल धनवे, भारत कांबळे, अक्षय कोकाटे, हर्षद वाघमारे, चेतन पवार, सुधीर कथले, युवराज औसरमल, श्रीकांत वाघमारे, प्रेम कांबळे हे आंदोलनात सहभागी झाले होते.