शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

जालना पंचायत समिती राज्यात मॉडेल ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:29 AM

शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी भुसे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदादाजी भुसे : पाच कोटी रूपये खर्च करून उभारणार अद्ययावत इमारत, संगणकीकरण आणि दस्तऐवजांचे डिजिटिलायजेशन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालनापंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी भुसे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जि. प. माजी अध्यक्ष पंडित भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि अर्जुन खोतकर नेहमी प्रयत्नरत असतो. आज ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात नसणारी पंचायत समितीची इमारत जालन्यात होत आहे. त्यामुळे याचा नक्कीच विकासासाठी फायदा होणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रंधानमंत्री आवास योजना सुरु केली. सध्या गावा - गावात सर्वे करण्यात येत आहे. परंतु, काही नागरिकांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्णच राहात होते. यासाठी सरकारने २०११ अगोदरच्या ज्या नागरिकांनी गायरान जमीनींवर कब्जा केला. त्यांना त्या जमीनी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.या नोंदणी दरम्यान एखाद्या ग्रामसेवकांने नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारही भुसे यांनी दिला. महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने बॅकांना कर्ज तसेच महिलांचे खाते उघडण्यासाठी बॅकांनी एक दिवस राखून ठेवण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सभापती सुमन घुगे, रघूनाथ तौर, पांडूरंग डोंगरे, दत्ता बनसोडे, ए. जे. बोराडे, पं.स. सदस्य संतोष मोहिते, जनार्दन चौधरी, सुनिल कांबळे, कैलास उभाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी मिना रवताळे, कार्यकारी अभियंता के. बी. मराठे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.अर्जुन खोतकर : दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारयावर्षी पाऊस न पडल्याने बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पशुसंर्वधन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकटीकरणामध्ये मोठा सहभाग असलेल्या बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी गटातील महिलांना अधिकाधिक बँककर्ज उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाpanchayat samitiपंचायत समिती