शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

३ खुनांनी जालना जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : येथील नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी ...

ठळक मुद्देखळबळजनक : अंबाजोगाईत नगरसेवक, शिरूरमध्ये तरूण, पेठ बीडमध्ये महिलेचा खून; पोलीस तपास सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई शहर स्तब्ध झाले आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता परळी वेस परिसरातील प्राणघातक हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भावकीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून भावाचे अनैतिक संबंध नगरसेवक जोगदंड यांना भोवले असल्याचे तपासातून पुढे आले आहे. यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, अद्यापही चौघे फरार आहेत.विजय यांचा लहान भाऊ नितीन यांच्या फिर्यादीनुसार दोन वर्षापूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे भगवान दत्तू जोगदंड आणि त्याची मुले नितीनवर चिडून होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणाऱ्या कमानीजवळ थांबला असताना राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सहा सख्खे भाऊ तलवार, गुप्ती आणि कोयता घेऊन तिथे आले. शिवीगाळ करत मालूने नितीनवर गुप्तीने वार केला. दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे माहीत झाल्याने नगरसेवक विजय जोगदंड यांनी तिथे धाव घेतली आणि हल्लेखोरांची समजूत घालू लागले. त्याचवेळी राज याने तलवारीने आणि करण याने कोयत्याने विजय यांच्या डोक्यात, कानावर, गालावर आणि हातावर सपासप वार केले. यात विजय जोगदंड गंभीर जखमी झाले. यावेळी नितीनने जीवाच्या भीतीने तिथून पळ काढला. विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीही घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर गल्लीतील लोकांनी विजय यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड, पो.नि. सोमनाथ गीते यांनी रुग्णालय आणि घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरु केला. घटनास्थळाहून जीवाच्या भीतीने पळालेला नितीन जखमी अवस्थेत मध्यरात्रीपर्यंत एका खदानीत लपून बसला होता. त्यानंतर काही व्यक्तींनी त्याला शोधून काढले आणि धीर देत पोलीस ठाण्यात घेऊन आले. रात्री उशिरा नितीन जोगदंड याच्या फिर्यादीवरून सहा आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी जमली. विजय जोगदंड यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.आरोपीच्या शोधासाठी पाच पथकेघटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळाहून हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली. रात्रीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नगरसेवक पदाची उल्लेखनीय कारकीर्ददोन वषार्पूर्वी अतिशय सामान्य घरातील विजय जोगदंड हे स्वत:च्या जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. नगर पालिका सभागृहात स्वच्छतेच्या प्रश्नावर आणि प्रभागातील अडचणीसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला. काही प्रश्नांवर त्यांनी थेट जिल्हाधिकाºयांकडेही तक्रारी केल्या होत्या. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात देखील त्यांचा पुढाकार असे.

टॅग्स :BeedबीडMurderखूनBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी