७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:09 IST2019-08-02T00:08:40+5:302019-08-02T00:09:08+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़

७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर उतरविला विमा
अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून ३१ जुलैपर्यंत केली होती.दोन दिवसातील आकडे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत बीड जिल्ह्यातील २३ हजार ६६ कर्जदार आणि २० लाख ३९ हजार ७१० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी ६९ कोटी ५२ लाख ७५ हजार रूपये भरले. गतवर्षी १४ लाख ११ हजार ६१३ शेतकºयांनी पीकविमा भरला होता़
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पर्जन्यमान कमी राहिले आहे. गतवर्षी १ आॅगस्टपर्यंत १९८ मिमी पाऊस झाला होता. यंदा १३९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आधार व संरक्षण म्हणून पीकविमा भरण्याकडे शेतकºयांचा कल राहिला.
20 लाख ६२ हजार शेतकºयांनी यंदा जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविल्याचे सूत्रांनी सांगितले.
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार.