शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पात्रूडमध्ये जिवंत अर्भक नालीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:26 AM

तालुक्यातील पात्रूड येथे नालीमध्ये एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार समोर आला. अर्भकाला तात्काळ बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. रूग्णालयात अनेक महिलांनी पुढाकार घेत त्याला मायेची ऊब दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील पात्रूड येथे नालीमध्ये एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार समोर आला. अर्भकाला तात्काळ बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. रूग्णालयात अनेक महिलांनी पुढाकार घेत त्याला मायेची ऊब दिली.सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून कुणाचा तरी आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांना ऐकावयास आले. यावर त्यांनी नालीमध्ये पाहिले असता पुरूष जातीचे नवजात अर्भक असल्याचे दिसले. गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख तौफीक, जफर कुरेशी यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांना माहिती दिली. नागरिकांनी अर्भकाला तात्काळ उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रसाद कुलकर्णी यांनी तपासणी करून अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. अर्भकाचे वजन ३ किलो असून, नाळ तोडलेली नसल्याने ते एक दिवसाचेच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यावर पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पोलीस नाईक राजेंद्र ससाणे, बापु मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.ही माहिती स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर त्यांनी रूग्णालय गाठत अर्भकाची पालकत्व स्विकारण्याची भावना पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान बीड येथील चाईल्ड लाईन या संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.महिनाभरात दुसरी घटनागत दोन आठवड्यांपूर्वी केज येथेही एका दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात फेकून दिल्याचे आढळले होते.याचा तपास बाकी असतानाच पात्रुडमध्ये पुन्हा तशीच घटना घडला आहे. अनैतिक संबंधातील बाळ असल्याने ते फेकून दिले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी