अर्भकाची हत्या

By Admin | Updated: April 1, 2017 03:48 IST2017-04-01T03:48:25+5:302017-04-01T03:48:25+5:30

दसरा मैदानाच्या मागे राहणाऱ्या एका विधवा महिलेला अनैतिक सबंधातून जन्मलेले

Infant killing | अर्भकाची हत्या

अर्भकाची हत्या

गेवराई (जि.बीड) : दसरा मैदानाच्या मागे राहणाऱ्या एका विधवा महिलेला अनैतिक सबंधातून जन्मलेले व अवघ्या चार तासांचे नवजात पुरूष जातीचे अर्भक निर्दयी मातेने घरातील डब्यात ठेवल्याने त्याचा मुत्यू झाला. शुक्र वार ही घटना उघडकीस आली.
महिलेचा पती चार वर्षांपूर्वी अपघातात मरण पावला होता. तिला तीन मुले असून, पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून ती उदरनिर्वाह करत होती; मात्र अनैतिक संबधामुळे तिला गर्भ राहिला. गुरुवारी ती घरीच प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Infant killing