शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

हृदयावर वाढता ताण; उच्च रक्तदाबाचे १६ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:25 PM

काम, व्यसन व मुख्य म्हणजे तणावामुळे नागरिकांच्या हृदयावर ताण वाढत असल्याचे समोर आले आहे.

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : काम, व्यसन व मुख्य म्हणजे तणावामुळे नागरिकांच्या हृदयावर ताण वाढत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मागील १७ महिन्यात तब्बल १५ हजार ८८५ रुग्ण उच्च रक्तदाबाने ग्रासले आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही पुरूषांच्या बरोबरीने असल्याचे उघड झाले आहे. ३० ते ५० वयोगटातील महिला, पुरूषांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले.उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला ‘सायलेंट किलर’ म्हणतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध झालेले रक्त संपूर्ण शरीरभर पसरविणे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा जोर व दाब असणे आवश्यक असते. या दाबालाच ‘रक्तदाब’ असे म्हणतात. उच्च रक्तदाब हा प्रामुख्याने आढळून येणारा आजार आहे. पूर्वी साठीच्या पुढे हा आजार दिसून येत असे; पण आता उच्च रक्तदाब हा तिशीतच डोके वर काढू पाहत आहे. स्त्री व पुरुषांची तुलना केल्यास ३० ते ४५ वयोगटांत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढलेले दिसून येते, तर ४० च्या पुढे स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) व अल्प रक्तदाब (हायपोटेन्शन) असे दोन प्रकार आहेत.उच्च रक्तदाबाची कारणे / लक्षणेकौटुंबिक इतिहास, वाढते वय, लिंग तसेच पर्यावरणीय घटक, खारट व तेलकट पदार्थांचे सतत सेवन, लठ्ठपणा, मद्यपान व धूम्रपानाचा अतिरेक, अनियमित व्यायाम, शरीराची कमीत कमी हालचाल, शारीरिक व मानसिक ताणतणाव, कमी झोप, मूत्रपिंड निष्क्रियता, मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांचे आजार, महाधमनी विच्छेदन, ब्रेन ट्यूमर, हृदय रक्तवाहिन्यांचे आजार ही उच्च रक्तदाबाचे प्रामुख्याने आढळून येणारी कारणे आहेत.डोके जड होणे, कमीतकमी हालचालींनीही थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर वारंवार अंधारी येणे, अस्वस्थ वाटणे, धाप लागणे, क्षुल्लक गोष्टींची भीती वाटून छातीत धडधड होणे, यासोबतच मळमळ, उलटी, आकडी, चक्कर वा बेशुद्धी अशी लक्षणेही आढळून येतात. जर उच्च रक्तदाब हा सिस्टोलिक १८० हून अधिक व डायस्टोलिक ११० हून अधिक असल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते.हा आहार फायद्याचाकेळी (रोज एक सेवन करणे, कारण त्यात पोटॅशिअम जास्त असते), डाळिंब, मोसंबी, द्राक्ष (काळे द्राक्ष जास्त गुणकारी), पपई इ. तसेच पालक, टोमॅटो, बीट रूट, मेथी, कांदा, आवळा, लसूण (एक पाकळी रोज सकाळी) हा आजार फायद्याचा आहे तर मासे, अंडी हे वर्ज्य करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स