भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:43+5:302021-03-10T04:33:43+5:30

मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवा माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात ...

Increase in accidents due to overloaded vehicles | भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवा

माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीकडे संबंधितांचे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

पाटोदा : तालुका आणि परिसरात वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तसेच शेतकरीदेखील त्रस्त झाले आहेत. या भागातील रोहित्र दुरुस्त करावेत, महावितरणचे अधिकृत लाईनमन नेमावेत, जुन्या तारा बदलाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पाईप बसवावा

रायमोहा : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

वाळू उपसा थांबवा

बीड : गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावांतून होणाºया वाळू उपशावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील गंगावाडी-राजापूर येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसतआहे. महसूलने कडक पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.

अतिक्रमण विळखा

केज : अंबाजोगाई-मांजरसुंबा या राज्यमार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या दरम्यानच बसस्थानक, शिवाजी चौक व प्रमुख बाजारपेठ असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा वादाचे प्रसंगदेखील उद्भवत आहेत. कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Increase in accidents due to overloaded vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.