पार्किंग अभावी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:03+5:302021-07-24T04:20:03+5:30
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर अंबाजोगाई : शहरातील काही भागांमध्ये घरगुती वापराचा सिलिंडरचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने या व्यावसायिकांवर ...

पार्किंग अभावी गैरसोय
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर
अंबाजोगाई : शहरातील काही भागांमध्ये घरगुती वापराचा सिलिंडरचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने या व्यावसायिकांवर कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सिलिंडरची मागणी वाढत आहे. त्यातच व्यावसायिक अधिक पैसे देऊन सिलिंडरची गैरमार्गाने खरेदी करीत असल्याचेही बोलल्या जात आहे.
अपुऱ्या बसफेऱ्यांनी प्रवासी त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावातून बस जात नसल्याने प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या तालुक्यात नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनानंतर अद्यापही अनेक बसफेऱ्या बंदच आहेत.त्या सुरू कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भिकुलाल लखेरा यांनी केली आहे.
मास्कचा विसर
अंबाजोगाई : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेकांना कोरोना नियमांचा विसर पडला असून मास्कचा वापर होताना दिसत नाही. बाजारात जाताना किंवा प्रवास करताना लहान मुलांना देखील मास्कची सुरक्षा दिली जात नाही.
‘नाल्यांची स्वच्छता करा’ !
अंबाजोगाई : शहरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई पालिकेने पावसाळ्याआधी केली. परंतु तरीही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा अडकलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.