शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

बीडमध्ये खासदारासह सहा आमदार ‘महायुती’कडे, ‘मविआ’ची होणार कसरत

By सोमनाथ खताळ | Published: April 11, 2024 11:34 AM

आघाडीकडे एक खासदार अन् एक आमदार : ठाकरे गट अन् काँग्रेसच्या प्रचाराकडेही लक्ष

बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात एक खासदार आणि सहा आमदार या संख्या बळामुळे महायुती मजबूत वाटत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे एक खासदार आणि एकच आमदार आहे. त्यातही उद्धवसेना आणि काँग्रेस पक्ष अजूनही प्रचारात फारसे सक्रिय झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणुकीत मविआला कसरत करावी लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीची अद्यापतरी ‘एकला चलो रे’ अशीच अवस्था आहे.

जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष मजबूत आहेत. शिंदेसेना, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस यांचा फारसा दबदबा नाही. परंतु या पक्षांचाही एक ठरावीक मतदार वर्ग आहे. त्यातच मागील काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात घडामोडी झाल्याने फाटाफूट झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेना यांची महायुती झाली असून राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी झाली. याचा आढावा घेतला असता सध्या महाविकास आघाडीकडे एक राज्यसभेचे खासदार आणि एक विधानसभा आमदार आहेत .त्यामुळे या निवडणुकीत मविआला कसरत करावी लागणार आहे. तर महायुतीकडे एक विधान परिषद, पाच विधानसभा सदस्य तर एक लोकसभा सदस्य एवढे संख्या बळ आहे. परंतु केवळ आमदार-खासदारांच्या संख्याबळावर नव्हे तर मतदारांचा कल कोणाकडे राहील यावर या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे.

‘वंचित’चा ‘मविआ’लाच फटका? मविआकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे उमेदवार असून त्यांच्याकडेही कुणबी मराठा म्हणून पाहिले जात आहे. हिंगे हे मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे मैदानात उतरल्या तर याचा फटका या दोघांनाही बसू शकतो. कारण दिवंगत विनायक मेटे यांचेदेखील मराठा आरक्षण लढ्यात योगदान मोठे आहे.

कोणाकडे किती संख्याबळमहायुती डॉ. प्रीतम मुंडे - लोकसभा सदस्यधनंजय मुंडे - विधानसभा सदस्यनमिता मुंदडा - विधानसभा सदस्यप्रकाश सोळंके - विधानसभा सदस्यबाळासाहेब आजबे - विधानसभा सदस्यलक्ष्मण पवार - विधानसभा सदस्यसुरेश धस - विधान परिषद सदस्य

महाविकास आघाडीरजनी पाटील - राज्यसभा सदस्यसंदीप क्षीरसागर - विधानसभा सदस्य

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bajrang sonwaneबजरंग सोनवणेPankaja Mundeपंकजा मुंडे