माजलगावात आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:57+5:302021-06-20T04:22:57+5:30

यावेळी आयएमए माजलगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर काकाणी म्हणाले, मागील दीड वर्षापासून डॉक्टर करत असलेली रुग्णसेवा सुरूच आहे. मात्र, डॉक्टरांवरील ...

IMA protests in Majalgaon with black ribbons | माजलगावात आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

माजलगावात आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

यावेळी आयएमए माजलगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर काकाणी म्हणाले, मागील दीड वर्षापासून डॉक्टर करत असलेली रुग्णसेवा सुरूच आहे. मात्र, डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्यांबाबत निषेध व्यक्त करत आहोत, आता हल्ले सहन करणार नाहीत. डॉ.शिवाजी काकडे यांनी सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवावी. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधातील खटले जलदगती न्यायालयांमध्ये चालवले जावेत, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार अशोक भंडारी यांना विविध मागण्यांचे निवेदन डाॅक्टरांनी दिले. यावेळी डाॅ.शिवाजी काकडे, डाॅ.शामसुंदर काकाणी, डाॅ.शंकर जुजगर, डाॅ.यशवंत राजेभोसले, डाॅ.विजय खळगे, डाॅ.सचिन डक, डाॅ.दीपक कोडगीरकर, डाॅ.सुशिल मुगदिया, डाॅ.राजेश रुद्रवार, डाॅ.स्वानंद कुलकर्णी, डाॅ.प्रवीण राठोड, डाॅ.परम राठोड, डाॅ.राहुल लड्डा यांची उपस्थिती होती.

जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे संरक्षण करा

महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आयएमएने राष्ट्रीय निषेध दिन पाळला. 'जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे रक्षण करा,' असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य होते. निषेध दिनाचे औचित्य म्हणून आयएमएच्या डॉक्टरांनी काळ्या फिती, काळी मुखपट्टी लावून काम केले. माध्यमे आणि समाज माध्यमांच्या मदतीने डॉक्टरांची बाजू समाजापर्यंत पोहोचविल्याचेही डॉ. श्यामसुंदर काकाणी म्हणाले.

===Photopath===

190621\purusttam karva_img-20210619-wa0026_14.jpg

Web Title: IMA protests in Majalgaon with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.