'मी लयी मोकार, दारूही पितो'; शक्तिप्रदर्शनात इच्छुक उमेदवार माेहन जगतापांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:02 IST2024-10-01T13:01:18+5:302024-10-01T13:02:08+5:30
शक्ती प्रदर्शनाचे झाले हसू; दारू पिण्याची कबुलीसह असंसदीय वाक्यांमुळे मेळाव्याला आलेल्या महिला भाषण सुरू असतानाच उठून जाताना पहावयास मिळाले.

'मी लयी मोकार, दारूही पितो'; शक्तिप्रदर्शनात इच्छुक उमेदवार माेहन जगतापांची जीभ घसरली
माजलगाव : मी लयी मोकार आहे... मी कायम खरे बोलतो... मी दारूही पितो.. असे म्हणत मोहन जगतापांची जीभ घसरली. काही असंसदीय शब्दही त्यांच्या तोंडून निघाले. त्यांनी घेतलेल्या शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे हसू झाल्याची चर्चा माजलगाव मतदार संघात आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला सुरुवात झाली असून लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून तगडी फील्डिंग लावली जात आहे. त्यापुर्वी बैठका, गाठीभेटी, मेळाव्यांचे आयोजन करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. माजलगावमध्ये अशोक डक यांनी मेळावा घेऊन चाचपणी केली. त्यापाठोपाठ रविवारी मोहन जगताप यांनीही मेळावा घेतला. यावेळी त्यांची जीभ घसरलीच, पण आपण दारू पित असल्याचे जाहिर कबुलीही त्यांनी दिली. याचा कथीत व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगतापांच्या यासह इतर वाक्यांमुळे मेळाव्याला आलेल्या महिला भाषण सुरू असतानाच उठून जाताना पहावयास मिळाले.
पक्षात राहून पक्षविरोधी कामाची सवय
यापूर्वी अनेक वेळा एका पक्षात राहून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधीत काम त्यांनी आतापर्यंत केलेले आहे. २०१९ च्या विधानसभेत रमेश आडसकर व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी पक्षापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचे तिकीट आपल्याला मिळणार नाही, म्हणून ते भाजपमध्ये राहून शरद पवारांची स्तुती करताना दिसत आहेत.