शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:12 IST

येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देवाहक चालकांचे बसेस थांबवून माजलगात दीड तास आंदोलन

माजलगाव : येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या रापमच्या चालक - वाहकांनी दीड तास बसेस थांबवून आंदोलन केले. परिणामी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला.शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान बसस्थानकातून जीवनापुर मार्गे सिरसाळा ही बस (क्र.एम. एच. २० बीएल ०२०३) ही बस दररोजच्या नियमानुसार प्रवाशांना घेवून निघाली असतानाच आऊट गेटमध्ये एक दुचाकी (क्र. एम. एच. ४४ एच १५७) आडवी लावलेली होती. त्यामुळे बस चालकाने हॉर्न वाजवले. म्हणून रामेश्वर कुमाजी घायाळ (रा. अशोकनगर) याने चालकाच्या बाजूने जावून चालक नवनाथ सोपान मुंडे यास शिवीगाळ करुन त्याच्या गचांडीस धरुन धक्काबुक्की केली, कपडे फाडले. यावेळी वाहक एम. पी. लगसकर हे खाली उतरुन काय झाले, अशी विचारणा करत असताना त्यांच्याही श्रीमुखात भडकावत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.हा प्रकार कळताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आगारातील सर्वच चालकांनी आपल्या गाड्या रोखल्या. बाहेरुन येणाºया गाड्या देखील मुख्य रस्त्यावरच रोखल्या. त्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली. अखेर आगार प्रमुख डी. बी. काळम पाटील व शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी मध्यस्थी करुन सर्व बसेस बाहेर काढून दिल्या. या मारहाण प्रकरणी नवनाथ सोपान मुंडे (चालक) याच्या फिर्यादीवरुन आरोपी रामेश्वर कुमाजी घायाळ याच्याविरुद्ध शिवीगाळ व मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पी. एस. आय. रमेश जाधवर हे करीत आहेत.जीपच्या आधी निघाली बस !या आगारात सकाळी पासून रात्री ९ वाजेपर्यंत अवैध वाहतूक करणारी जीप, टमटम आदी वाहने उभे असतात. या अवैध वाहतुकीचा धंदा करणाऱ्यांचे अनेक वाहक - चालकांशी साटेलोटे असल्याने अवैध प्रवासी गाडी भरुन गेल्याशिवाय बस निघत नाहीत. परंतु माजलगाव -सिरसाळा गाडी वेळेत निघाल्याने व जीप न भरल्याने चिडलेल्या जीप चालकाने मारहाण केल्याची चर्चा चालक वाहकात दबक्या आवाजात करताना दिसून येत होती.प्रवाशास मारहाणहा गोंधळ अनेक वेळापासून सुरु असल्याने तीन चार प्रवाशांनी येवून येथे जमलेल्या वाहक चालकांना बस सोडण्याची मागणी केली. परंतु आमचे येथे काय चालले आहे असे म्हणत एका वाहकाने प्रवाशाच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे गोंधळात भर पडली.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीEmployeeकर्मचारीagitationआंदोलन