अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:29+5:302021-02-13T04:33:29+5:30
गंगामसला : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी पकडून जप्त केला. ही कारवाई गुरूवारी दुपारी ...

अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टर पकडला
गंगामसला : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी पकडून जप्त केला. ही कारवाई गुरूवारी दुपारी ११ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तालुक्यातील आबेगाव जवळील चारीला करण्यात आली.
तालुक्यातील आबेगाव शिवारात शेत गट नंबर २११ शेत मालक पाडुरंग बाबारोहब शेजुळ यांच्या ऊस पिकाजवळ टॅक्टरने वाळुची चोरटी वाहतुक करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यावरुन बातमी मिळाल्याने तहसीलदार वैशाली पाटील, मंडळ अधिकारी पी.एस.मुळाटे, व्ही.एन.टाखणखार, तलाठी व्ही.एस.शिलवंत, सुनिता ठोसर, कोतवाल गणेश खेत्री, नारायण खेत्री, वाहन चालक केरबा तपासे यांचे पथक आबेगांव शिवारात गेले. यावेळी ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली दिसून आली. ट्रॅक्टर चालकाने त्या ठिकाणावरून पळ काढला. यावेळी पथकाने १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत.