अवैध वाळूचा ट्रॅक्टर, आठ हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST2021-05-15T04:32:11+5:302021-05-15T04:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील तलवाडा पोलिसांच्या पथकाने गुरुवारी लोणावळा फाट्याजवळ अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. आठ हजारांची ...

Illegal sand tractor, eight thousand liquor seized | अवैध वाळूचा ट्रॅक्टर, आठ हजारांची दारू जप्त

अवैध वाळूचा ट्रॅक्टर, आठ हजारांची दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील तलवाडा पोलिसांच्या पथकाने गुरुवारी लोणावळा फाट्याजवळ अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. आठ हजारांची दारू जप्त केली आहे, तर गोपत पिंपळगाव येथील नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारी केनी व ट्रॅक्टर जप्त केला आहे. सुमारे दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांना लोणावळा फाट्याजवळ अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून आठ हजार रुपये किमतीचे तीन बॉक्स देशी दारू जप्त केली आहे. तर गोपत पिंपळगावजवळील गोदावरी नदी काठी वाळूचा अवैध उपसा करताना केनीसह ट्रॅक्टर असा २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस नाईक कृष्णा वडकर, राऊत, राहटवाड यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

===Photopath===

140521\sakharam shinde_img-20210514-wa0049_14.jpg~140521\sakharam shinde_img-20210514-wa0050_14.jpg

Web Title: Illegal sand tractor, eight thousand liquor seized