शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 2:52 PM

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता.

ठळक मुद्दे एका पावसा अभावी शेतकरी कंगाल  तुरीच्या तुऱ्हाट्या आणि कापसाचे झाले खराटे

शिरुर कासार (बीड ) : आतापर्यत कधी अनुभवले नाही आणि ऐकलेही नाही असा प्रसंग तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता. मात्र, तसे न होता शेतकरी पुरता नागवला गेला. पिके गेली, चारा नाही आणि पाणीही नाही अशा उजाड झालेल्या वाळवंटात गुजराण कशी करायची याची भ्रांत. सुखाची झोप येऊ देईना, सरकार मायबाप काय दिलासा देतय यावर सारं आता अवलंबून आहे.

साखर आणि गूळ पिकवणारा तालुका आता पाण्याअभावी पांढऱ्या सोन्याकडे झुकला होता. गेल्या काही वर्षांपासून कापूस आधारभूत मानला जायचा पण त्यालाही आता उतरणी सुरु झाली आणि यावर्षी तर खर्च करुन शेतकरी फक्त तुरीच्या तुराट्या आणि कापसाच्या खराट्याचा मालक बनला. झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यापोटी अब्जाधिश होऊ पहात असलेला शेतकरी हातात कटोरी घेऊन सरकारकडे मदतीची याचना करु लागलाय. बळीराजाच बलहीन झाल्याने विकासाचा कणाच मोडू पहातोय.

तालूक्याचे भौगोलिक क्षेत्र ६५०१८.४ हेक्टर असून, त्यात पेरणी क्षेत्र ५५३३९.६ हेक्टर आहे. या वर्षी खरीपात २७४३१ हेक्टरवर कापूस लागवड केली होती. उगवणीत व पुढे मशागतीच्या जोरावर चित्र चांगले दिसत होते. कापूस उत्पादनाचा अंदाज बांधत बिचारा शेतकरी संध्याकाळी चतकोर भाकरी जास्त खात होता. मात्र, हे सारे मृगजळ ठरले आणि पावसाने होत्याचे नव्हते केले. हेक्टरी किमान १५ ते ३० क्विंटल उतारा होणारा कापसाचा काटा २ ते ३ क्विंटलवर अडकला आणि कापसाचा शेवट झाला. आता आहे तो भाव जरी अपेक्षित उत्पन्न होऊन मिळाले असते तरी शेतकऱ्याचे हात सोन्यासारखे पिवळे झाले असते. त्याच्या हाताला कोळशाच रंग लागला गेला.

कापसासारखीच इतर पिकांची स्थिती६३९२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला खरा; मात्र तुरीच्या फुलांचा पिवळा रंग येताच पावसाअभावी फुलाला शेंगा न लागताच फुलासहीत पानेही वाळून खाली पडली व तुराट्याच हाती आल्या. मूग घुगऱ्यापुरताही हातात आला नाही. उडीद हातचे गेले. ८८५ हेक्टरवरच्या भुईमुगाचा पालाच झाला. सोयाबीन मुगासारखे बारीक जन्मले म्हणून भावात त्याने मार खाल्ला.१०५ हेक्टरवर तर चटणी पुरतेही कारळ झाली नाही. हा सारा हिशेब आकडेवारीत मांडला तर अब्जाधिश म्हणणे गैर ठरणार नाही. एका पावसाने शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला हेच खरे म्हणावे लागेल.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र