'I miss you, my love', युवकाने धुळवडीच्या दिवशी स्टेटस ठेवून संपवले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 16:34 IST2022-03-19T16:34:32+5:302022-03-19T16:34:49+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

'I miss you, my love', युवकाने धुळवडीच्या दिवशी स्टेटस ठेवून संपवले आयुष्य
गेवराई (बीड ) : बाहेर धुलीवंदनाचा जल्लोष सुरु असताना एका युवकाने व्हाट्सअपवर, 'I miss you, my love,miss you friend, bay, my jigri,Sorry' असे स्टेटस ठेऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आगरनांदूर येथे उघडकीस आली आहे. नितीन चिमाजी निर्मळ ( 23) असे मृत युवकाचे नाव आहे.
आंगरनांदुर येथील नितीन निर्मळ हा धुलीवंदनाच्या दिवशी गावात होता. गावात सर्वजण रंग खेळत जल्लोष करत असताना नितीन याने व्हाट्सअपवर 'I miss you, my love,miss you friend, bay, my jigri,Sorry,शेवट' असे स्टेटस ठेवले. त्याच्या मित्रांनी, नातेवाईकांनी स्टेट्स पाहताच त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याचा शोध घेतला असता गावाजवळील गायरानात एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. बीट अंमलदार अशोक हंबरडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नितीन याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.