शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:09 IST

पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या

बीड: पतीनिधनानंतर एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी एका महिलेने सुपारी देऊन त्याचा काटा काढला. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी अपघात भासविण्यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला व टेम्पोवर दुचाकी धडकवली. मात्र, गुन्हे शाखा व बीड ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या सिनेस्टाइल मर्डर मिस्ट्रीचा थरारपट उलगडला. यातील पाचपैकी तीन आरोपींना गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १२ जून रोजी पत्रपरिषदेत दिली.

बीड- नगर मार्गावरील पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर ११ जून रोजी पहाटे एका व्यक्तीचे प्रेत आढळले हाेते. जवळच दुचाकी होती. बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत ओळख पटवली असा मृतदेह मंचक गोविंद पवार (४५, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड) याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पालथा पडलेला होता. डोक्यात मागील बाजूने वार जखम होती व दुचाकीचे (एमएच १२ एलटी-३२१७) हेडलाईट वगळता कुठेही नुकसान नव्हते. शिवाय पत्नी निर्विकार होती, तर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दु:ख नव्हते.

यावरून पोलिसांना घातपाताचा संशय आला होता. पो.नि. संतोष साबळे, उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. चौकशीत मंचक पवार यांचा पत्नीनेच सुपारी देऊन काटा काढल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक देविदास आवारे यांच्या फिर्यादीवरुन पत्नी गंगाबाई मंचक पवार (३७, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड), श्रीकृष्ण सखाराम बागलाने (२७,रा.काकडहिरा ता.बीड),सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (४७,रा.पारगाव सिरस ता.बीड) व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

दहा लाखांची सुपारी, दोन लाख इसारमंचक पवार यांची सासरवाडी साक्षाळपिंप्री (ता.बीड) आहे. त्यांची पत्नी गंगाबाईच्या भावाचे निधन झाल्याने सासरवाडीची चार ते पाच एकर जमीन मिळाली होती. मात्र, ती गंगाबाईच्या नावे आहे. दरम्यान, मंचक यांच्या नावे एक कोटीचा विमा काढला होता. गंगाबाईचा या पैशांवर डोळा होता. त्यासाठी तिने दोन मित्रांना दहा लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख इसार म्हणून दिले. सुपारी घेणारे दोघेही फरार असून त्यांच्या इशाऱ्यावर खून करणारे श्रीकृष्ण बागलाने (रा.काकडहिरा, ता. बीड) व सोमेश्वर गव्हाणे (४७, रा. पारगाव सिरस) व गंगाबाई मंचक पवार यांना गुन्हे शाखेने अटक केली.

दारू पाजली, डोक्यात मारला व्हिल पाना१० जून रोजी चाैघांनी मंचक पवार यांचा खून करण्याचा कट आखला. मंचक पवार हे नेहमी साक्षाळपिंप्री येथे शेतात ये-जा करत. १० रोजी ते नित्याप्रमाणे शेतात गेल्यावर त्यांना संपर्क करून या चौघांनी गाठले. आरोपी टेम्पोतून पिंपरगव्हाण शिवारात पोहोचले. तेथे एका झाडाखाली त्यांनी मंचक पवार यांना दारू पाजली व ते स्वत:ही प्यायले. सोमेश्वर गव्हाणे याने त्यांच्या डोक्यात मागील बाजूला व्हिल पाना मारला. रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

यांनी केली कारवाईगुन्हे शाखेचे पोे. नि. सतीश वाघ, ग्रामीण ठाण्याचे पो. नि. संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, हवालदार कैलास ठोंबरे, नसीर शेख, अभिमन्यू औताडे, पो.ना.सतीश कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, विकी सुरवसे, संपत तांदळे, गणेश मराडे, अतुल हराळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक