पतीने दिले सिगारेटचे चटके, दिराचा भावजयीवर बलात्कार
By शिरीष शिंदे | Updated: March 26, 2023 19:00 IST2023-03-26T19:00:14+5:302023-03-26T19:00:23+5:30
बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल,आरोपींचा शोध सुरू

पतीने दिले सिगारेटचे चटके, दिराचा भावजयीवर बलात्कार
बीड : एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासूने तिला मारहाण करत इस्त्री व सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर संभाजीनगर येथे नेऊन दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात पती,सासू व दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका विवाहितेस तिचा पती व सासूने मार्च महिन्यात त्रास दिला. या कालावधीत सदरील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन इस्त्री व सिगारेटचे चटके दिले. दरम्यान,नणंदेची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगून सदरील विवाहितेला संभाजीनगर येथील घरी नेण्यात आले. त्या ठिकाणी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नणंदेच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून दिराने त्या विवाहितेवर अत्याचार केला. या घटनेची माहिती विवाहितेने पतीला दिली मात्र त्यामुळे काय होते ? असे म्हणत ही गोष्ट कोणालाही सांगू नको, नाही तर तुला ठार मारील अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय अंतरप करीत आहेत.