पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:38 IST2018-10-19T19:37:05+5:302018-10-19T19:38:28+5:30
पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली हा अपमान असहय्य झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या
बीड : आपली पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली हा अपमान असहय्य झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. शुक्रवारी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
लक्ष्मण हरिभाऊ पुरी (४०, रा. धारवंटा, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. लक्ष्मण व त्यांची पत्नी सुनिता हे उसतोड मजूर आहेत. १० दिवसांपूर्वीच त्यांनी दोन लाख रुपयांची उचल घेतली होती. नवरात्रोत्सवानिमित्त १५ आॅक्टोबर रोजी तलवाड्यातील देवीच्या दर्शनासाठी दोघेही गेले. गर्दीत लक्ष्मणची नजर चुकवून सुनिता ही गायब झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.
या संदर्भात तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. चौकशी केली असता गावातीलच रामचंद्र वारुळे याच्यासोबत ती पळून गेल्याचे समजले. गावात सर्वत्र चर्चा झाली. त्यामुळे लक्ष्मण यांना अपमान वाटला. हा अपमान असहय्य झाल्याने त्यांनी गुरुवारी राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. बाबू पुरी यांच्या माहितीवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.