तिसरी लाट कशी रोखणार? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:12+5:302021-07-21T04:23:12+5:30
सोमनाथ खताळ बीड : लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण, ही म्हण हेल्थ केअर वर्कर्ससाठी लागू होत आहे. ...

तिसरी लाट कशी रोखणार? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी...!
सोमनाथ खताळ
बीड : लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण, ही म्हण हेल्थ केअर वर्कर्ससाठी लागू होत आहे. इतरांना कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगत आवाहन केले जाते, तर दुसऱ्या बाजूलाच हे आरोग्यकर्मी लस घेण्यापासून दूर पळत असल्याचे समोर आले आहे. यात फ्रंटलाइन वर्कर्सही मागे नसल्याचे दिसते. पहिला डोस घेतल्यानंतर त्रास झाल्याने दुसरा डोस घेण्याकडे त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. काही लोकांनी अद्याप एकही डोस घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
लसीकरणाबाबत उदासीनता का?
n १८ वर्षांवरील प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी. एवढेच नव्हे तर गर्भवती महिला, प्रसूती माता, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगत लस घेण्याबाबत हेल्थ केअर वर्कर्सकडून अवाहन केले जात असून आजही ते सुरूच आहे.
n वास्तविक पाहता याच लोकांकडून लसीकरण करून घेण्यास उदासीनता असल्याचे दिसते. काहींच्या मनात भीती असणे तर काहींना याचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले आहे.
पहिला आणि दुसरा डोसमधील तफावत शोधणे सुरू आहे. काही लोकांनी पहिला डोस वेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व दुसरा वेगळ्या क्रमांकावरून घेतल्यानेही आकडेवारीत तफावत आहे. परंतु एवढा आकडा का आहे, याची चाचपणी सुरू आहे. तसेच आणखी किती बाकी आहेत, याची माहिती घेतली जात आहे.
- डॉ. रौफ शेख, नोडल ऑफिसर लसीकरण बीड