शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल, हातगाडे, फळ व्यावसायिकांची अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे फिरवली पाठ; प्रशासनाकडून एकही कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST

माजलगाव : काेरोनाचे दिवसेंदिवस रुग्णांत वाढ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देत व्यापाऱ्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करणे बंधनकारक केले. ...

माजलगाव : काेरोनाचे दिवसेंदिवस रुग्णांत वाढ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देत व्यापाऱ्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करणे बंधनकारक केले. मात्र, अद्यापही माजलगाव शहरासह तालुक्यात हातगाडे, फळ व्यावसायिकांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यास पाठ फिरविली आहे, असे असताना ही, प्रशासनाने दुर्लक्ष करत एकही कारवाई केलेली नाही.

माजलगाव तालुक्यात मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जास्त संपर्कात असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक केले होते. सुरुवातीस व्यापाऱ्यांनी या टेस्टकडे पाठ फिरविली होती, परंतु, प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन टेस्ट करा, अन्यथा दुकाने उघडू देणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. त्यावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या; परंतु, यात हातगाडे, फळ व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिकांनी सपशेल या अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे पाठ फिरवली आहे. हे व्यावसायिक ही मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येतात, कारण याचे व्यवसाय हे मुख्य रस्त्यावरच आहेत. ही बाब स्थानिक प्रशासनाने कामाचा लोड नको, म्हणत दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. परंतु, आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर यास प्रशासनास या चुकीची किंमत मोजावी लागेल.

न.प.चे पथक नावालाच

प्रशासनाने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अँन्टीजन टेस्ट अनिवार्य केली होती. मोठ्या व्यावसायिकांनी अँन्टीजन टेस्ट करून घेतल्या परंतु शहरातील छोट्या हाॅटेल, फळविक्रेते, गाडेवाल्यांनी अद्याप कोरोना टेस्टच केल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

कोणी टेस्ट केली की नाही हे पाहण्यासाठी नगरपालिकेने आठ दिवसांपूर्वी ३-४ वेगवेगळी पथकांची नेमणूक केली. मात्र, शहरातील २५ ते ३० टक्के व्यापाऱ्यांनी अँन्टीजन टेस्ट केलेल्या नसताना या पथकाकडून आठ दिवसांत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.