राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST2021-09-11T04:35:04+5:302021-09-11T04:35:04+5:30

सामाजिक न्याय भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस ...

Honoring police officers who received the President's Medal | राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

राष्ट्रपती पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

सामाजिक न्याय भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक आर. राजा, निवृत्त सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, सहायक उपनिरीक्षक राजाभाऊ गुळभिले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा. सर्जेराव काळे, विष्णू देवकते, महंत सुरेशानंद महाराज उपस्थित होते. यावेळी पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या चित्तथरारक कामगिरींचा पट उलगडला. सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कृ.उ.बा.चे सभापती दिनकर कदम, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, अशोक पांढरे, भगवान माने, भगवान सोनवणे , बिभीषण शिंदे, प्रा. रेखा निर्मळ, सुदर्शन भोंडवे, गुलाब भोंडवे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुशराव येळे, भास्कर चादर, ॲड.राजू शिंदे, ॲड. सचिन कोळेकर, प्रा. हनुमंत सोट, प्रकाश बुधनर, आण्णासाहेब मतकर, अमर वाघमोडे, सचिन ठेंगळ, प्रकाश घुगे, अंकुश गवळी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Honoring police officers who received the President's Medal