शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

नोकरी लागत नसल्याने उच्चशिक्षित युवकाची शाळेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 3:31 PM

वडील शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कुलूप तोडून त्याने आत प्रवेश केला

ठळक मुद्देनोकरी नसल्याने होता नैराश्यात कुलूप तोडून केला खोलीत प्रवेश

केज (बीड ) : बीएस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतरही अनेकदा प्रयत्न करुनही नौकरी लागत नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून सुशिक्षित बेरोजगार युवकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील लहुरी येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

अक्षय गणपती चाळक (२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.  अक्षयचे शिक्षण बीएस्सी अ‍ॅग्री झालेले होते. नौकरीसाठी त्याने अनेकदा प्रयत्न व पाठपुरावा करुनही नौकरी लागत नसल्याने तो नैराश्यात होता. त्यामुळेच त्याने लहुरी येथील लिंबाचावडा वस्तीवरील ज्या शाळेत वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्याच शाळेच्या खोलीचे कुलुप तोडुन आत प्रवेश करीत शाळेतील एका खोलीमध्ये लोखंडी गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

शाळेच्या खोलीचे दार उघडे दिसल्याने वडिलांनी खोलीत डोकावून पाहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुकुंद ढाकणे हे करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीSchoolशाळा