ग्रामसेवकांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत : उबाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:06+5:302020-12-29T04:31:06+5:30

श्री ग्रामसेवक पतपेढीची वार्षिक सभा : कर्जमर्यादेत वाढ, व्याजदारात केली घट बीड : ग्रामसेवकांची पतपेढी ...

Helping Gramsevaks to overcome financial difficulties: Boil | ग्रामसेवकांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत : उबाळे

ग्रामसेवकांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत : उबाळे

श्री ग्रामसेवक पतपेढीची वार्षिक सभा : कर्जमर्यादेत वाढ, व्याजदारात केली घट

बीड : ग्रामसेवकांची पतपेढी ही सर्व ग्रामसेवक बांधवाच्या आर्थिक अडचणी दूर करणारी तात्काळ कर्ज पुरवठा करणारी संस्था असल्याचे मत उपस्थित सभासदांनी व्यक्त केले. श्री ग्रामसेवक सहकारी पतपेढीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या कर्जाचा व्याजदर १२ वरून १० टक्के करण्याचा निर्णय चेअरमन बाबुराव ननवरे,सचिव बाळासाहेब जायभाये यांनी घेतला.

शनिवारी झालेल्या या सभेत सभासदांना कर्जमर्यादा ६ लाखांवरून १० लाख रूपये करण्यात आली. शेअर्स ची मासिक रक्कम २००० रूपये करण्यात आली. कर्जाचा व्याजदर १० टक्के करण्याबाबत कोषाध्यक्ष दत्तात्रय नागरे व इतर सभासदांनी सूचना केली होती. या निर्णयाचे सर्व सभासदांनी स्वागत केले.

या आर्थिक वर्षात संस्थेला ९६ लक्ष रुपये नफा झाल्याबद्दल बीड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळीराम उबाळे,सचिव भगवानराव तिडके यांनी चेअरमन बाबुराव ननवरे,सचिव बाळासाहेब जायभाये व सर्व संचालकांचे कौतुक केले. कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी आभार मानले. या सभेस ग्रामसेवक युनियनचे विभागीय सचिव नारायण बडे,मग्रारोहयो चे ग.वि.अ. दिपक जोगदंड,सुधाकर नागरगोजे,सखाराम काशीद,भाऊसाहेब मिसाळ,कुडके बाबासाहेब,प्रशांत कुलकर्णी,रामकृष्ण यादव,धनराज सोनवणे,ओम चोपणे,राम केदार,संचालिका पठाण मॅडम,पोटभरे मॅडम,चोपडे मधुकर,शेषेराव नखाते,बंडू जांभळे,प्रदीप बनकर,संजय देशमुख,विजय गायसमुद्रे, लेंडाळ संदीपान, किरण वणवे,साहेबराव चव्हाण, आदी उपस्थित होते.

Web Title: Helping Gramsevaks to overcome financial difficulties: Boil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.