परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; माजलगाव धरणाचे ११ गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:39 PM2020-10-12T12:39:00+5:302020-10-12T12:48:02+5:30

11 gates of Majalgaon dam opened धरणात पाण्याची आवक वाढल्याने तातडीने केला विसर्ग

Heavy presence of return rain; 11 gates of Majalgaon dam opened | परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; माजलगाव धरणाचे ११ गेट उघडले

परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; माजलगाव धरणाचे ११ गेट उघडले

Next
ठळक मुद्देसिंधफणा नदीत २२ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्गपहाटे ७ गेट तर सकाळी नऊ वाजता आणखी दोन गेट उघडून विसर्ग

माजलगाव  : रविवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. यामुळे सोमवारी सकाळी धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. धरणातून २२ हजार क्युसेसने पाणी सिंधफणा पात्रात सोडण्यात येत आहे.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. हे धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आजपर्यंत धरणातून  पाण्याचा विसर्ग सिंधफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाचे सर्वात जास्त ११ गेट द्वारे ६१ हजार क्युसेस ऐवढे पाणी सोडण्यात आले होते. मागील आठवड्यापासून शनिवारपर्यंत १ गेटद्वारे १ हजार २०० क्युसेसनने पाणी सोडण्यात येत होते. शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी सकाळपासून तीन गेटद्वारे ६ हजार क्युसेनने विसर्ग करण्यात आला.  

यानंतर रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्याप्रमाणात आवक वाढली. यामुळे सोमवारी पहाटे ७ गेट तर सकाळी नऊ वाजता आणखी दोन गेट उघडून एकूण ११ गेटद्वारे २२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सिंधफणा नदीपात्रात करण्यात आला. पुढील दोन दिवसात आणखी जोरदार पाऊस येण्याचा अंदाज आहे. यासाठी आम्ही पुढील नियोजनासह सज्ज असल्याचे धरणाचे उपविभागीय अधिकारी सी. एम. झेंड व कनिष्ठ अभियंता बी. आर. शेख यांनी सांगितले.

Web Title: Heavy presence of return rain; 11 gates of Majalgaon dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.